• Home
  • Blogs
  • Marathiकेंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केले गांधीधाम येथील ‘आयुष वना’चे उद्‌घाटन

केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केले गांधीधाम येथील ‘आयुष वना’चे उद्‌घाटन

User

By NS Desk | 20-Oct-2021

Shri Sarbananda Sonowal inaugurates Ayush Van news in marathi

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी गांधीधाम शहरातील दीनदयाळ पोर्ट ट्रस्ट- रोटरी फॉरेस्ट येथे झालेल्या कार्यक्रमात आयुर्वेदिक वनस्पतींच्या संवर्धनासाठी समर्पित ‘आयुष वना’चे उद्‌घाटन केले. दीनदयाळ पोर्ट ट्रस्टतर्फे देण्यात आलेल्या हरित पट्ट्यातील 30 एकर जमिनीवर हे ‘आयुष वन’ उभारण्यात आले आहे. शहरी भागातील हिरवाईचा दर्जा सुधारण्यासाठी आणि कच्छ विभागातील वृक्षांच्या आच्छादनाची घनता वाढविण्यासाठी या वनातील जमिनीवर झाडे लावण्यात येत आहेत.  या वनाच्या उद्घाटनानिमित्त केंद्रीय मंत्र्यांनी रोपट्याची लागवड देखील केली.

याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी आयुष वन विकसित करण्यात योगदान देणाऱ्या सर्व हितसंबंधीयांचे कौतुक केले आणि भारतातील औषधी वनस्पतींमध्ये असणारी उच्च क्षमता आणि लाभ अधोरेखित केले. भारताच्या औषधोपचारांच्या पारंपरिक पद्धतीमध्ये असणारी क्षमता समजून घेण्यासाठी आयुष मंत्रालयाने हाती घेतलेल्या कामांवर देखील सोनोवाल यांनी प्रकाश टाकला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आयुष उपचार पद्धती जागतिक पातळीवर पोहचली आहे आणि आता या उपचार पद्धतीने स्वास्थ्य राखण्यासाठी जागतिक पातळीवर स्वीकारण्यात आलेल्या मुख्य प्रणालींमध्ये स्थान मिळविले आहे.” असे त्यांनी सांगितले.

पुढे वाचा► गुळवेल वापरण्यासाठी सुरक्षित आहे: आयुष मंत्रालय

डिस्क्लेमर - लेख का उद्देश्य आपतक सिर्फ सूचना पहुँचाना है. किसी भी औषधि,थेरेपी,जड़ी-बूटी या फल का चिकित्सकीय उपयोग कृपया योग्य आयुर्वेद चिकित्सक के दिशा निर्देश में ही करें।