• Home
  • Blogs
  • Marathiआयुष-64 विरोधात प्रसारमाध्यमातील एका गटाद्वारे होत असलेल्या हिणकस टिकेचा आयुष मंत्रालयाने केला तीव्र निषेध

आयुष-64 विरोधात प्रसारमाध्यमातील एका गटाद्वारे होत असलेल्या हिणकस टिकेचा आयुष मंत्रालयाने केला तीव्र निषेध

User

By NS Desk | 27-Aug-2021

AYUSH-64

व्यापक चाचण्या आणि अनेक अभ्यासानंतर आयुष-64 हे कोविड-19 वर प्रतिबंधक उपचार आणि व्यवस्थापनावर आधारीत प्रभावी आयुर्वेदीक औषध विकसित केले आहे. त्या विरोधात ही एकतर्फी टीका केली जात आहे.

प्रकाशनपूर्व अवस्थेत असलेल्या एका छोट्या अभ्यासाचा ( त्याचे अजून तज्ञांनी पुनरावलोकनही केलेले नाही)  दाखला देत प्रसारमाध्यमातील एका गटाद्वारे आयुर्वेद आणि आयुष मंत्रालयाविरोधात गेल्या दोन दिवसांपासून खोडसाळ मोहिम राबवली जात आहे. व्यापक चाचण्या आणि अनेक अभ्यासानंतर आयुष-64 हे  कोविड-19 वर प्रतिबंधक उपचार आणि व्यवस्थापनावर आधारीत प्रभावी आयुर्वेदीक औषध विकसित केले आहे. त्या विरोधात ही एकतर्फी टीका केली जात आहे.

वृत्तलेखात, प्रकाशनपूर्व अवस्थेत असलेल्या एका प्रबंधाचा दाखला दिला आहे. (त्यात लेखकाने स्वतःच म्हटलंय की प्रबंध छोटा आणि प्राथमिक अवस्थेत आहे) त्यात, आयुष मंत्रालय आणि टास्क फोर्सच्या प्रामाणिक प्रयत्नांवर शंका उपस्थित केली आहे. आयुष मंत्रालयाने अॅलोपॅथी आणि आयुर्वेद अशा दोन्ही क्षेत्रातील तज्ञ संशोधकांचे टास्क फोर्स अर्थात कृतीदल तयार केले आहेत हे नमूद करायला हवे

जयपूर इथली राष्ट्रीय आयुर्वेद संस्था आणि जोधपूर इथली अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था यांनी मिळून या संशोधन प्रकल्पावर काम केले आहे. ते प्रकाशनपूर्व अवस्थेत आहे. याचा दाखला देत खोडसाळ प्रश्न उपस्थित केला जात आहे. या दोन्ही संस्था प्रतिष्ठित आहेत. रुग्णांची काळजी घेणे असो किंवा संशोधन या दोन्ही संस्था आपापल्या क्षेत्रात शिक्षणासंबंधित सर्वोच्च मानल्या जातात. त्यांना थोर परंपरा आहे. त्यांनीही आपल्या अभ्यासाचा विपर्यास केला जात असल्याचे स्पष्ट करत निषेध केला आहे.

मंत्रालयाने डॉ. जयकरण चरण यांच्या विधानाचाही दाखला दिला आहे. माध्यमांनी त्यांचे विधान चुकिच्या पद्धतीने मांडले आहे. त्यांनी माध्यमातील वृत्ताचे स्पष्टपणे खंडन केले. “ आयुष-64 प्रभावी नाही किंवा निरूपयोगी आहे असे मी कधीच म्हटले नाही. उलट, प्राथमिक अंतिम अवस्थेत आयुष-64 ने परिणामकारकता दाखवली आहे. निष्कर्षात तर आयुष-64 हे सुरक्षित औषध असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षिततेसह काळजी घेण्याचा दर्जाही यात राखला आहे. सांख्यिकीयदृष्ट्या "फरक नाही" याचा अर्थ प्रभावी नाही किंवा निरुपयोगी आहे असा होत नाही, तर "समतुल्य" असा होतो. विशिष्ट हेतूने प्रेरीत वृत्तलेख तथ्यांचा विपर्यास आणि पेला अर्धा रिकामा पाहण्याच्या दृष्टिकोणाचा उत्तम नमूना आहे.
तसेच, इंग्रजी मध्ये वाचा► Ayush Ministry Strongly Condemns the Tirade Against AYUSH-64 by a Section of Media

पूर्वप्रकाशन अवस्थेतील अभ्यासात स्पष्टपणे नमूद केले आहे, की “ आरटीपीसीआर निगेटिव चाचणीबाबत दोन गटांची तुलना केली असता पाचव्या दिवशी, आयुष-64 घेतलेल्या गटातील 21 (70%) तर इतर नियंत्रित गटातील 16 (54%) आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली. खरंतर, आरटीपीसीआर निगेटिव्हचा विचार करता आयुष-64 गटाचे प्रमाण अधिक होते तरी सांख्यिकीयदृष्ट्या हा फरक लक्षणीय नव्हता [p=0.28].

ताप, श्वसनासंबंधित लक्षणे आणि प्रयोगशाळांच्या मापदंडाच्या कसोटीवर दोन गटातील सांख्यिकीय फरक लक्षणीय नव्हता. मूल्यांकनाच्या काळात दोन्ही गटात कोणत्याही गंभीर प्रतिकूल परिणामाची नोंद झाली नाही. अभ्यासातील निष्कर्षातून स्पष्ट होते की, आयुष-64 हे सुरक्षित औषध आहे. सुरक्षिततेच्या बरोबरीनेच काळजी घेण्याच्या मानकांबाबतही ते समतुल्य आहे. पूर्वप्रकाशन अवस्थेतील अभ्यासात एका व्यापक अभ्यासाचाही दाखला दिला आहे, (चोप्रा ए, टिल्लू जी,   चौधरी के, रेड्डी जी, श्रीवास्तव ए , लकडावाला एम, इत्यादी. सौम्य आणि मध्यम कोविड-19 मधे काळजी घेण्याच्या मानकांबाबत आयुष-64 चे समन्वयन: यादृच्छिक, नियंत्रित, बहुकेन्द्री क्लिनिकल चाचणी. medRxiv 2021.06.12.21258345. https://doi.org/10.1101/2021.06.12.21258345) छापील मजकूराची जबाबदारी यावर आहे. (याद्वारे पूर्वप्रकाशन अवस्थेतील रिक्त मजकूराची जबाबदारी घेतली जाते. )

संबंधित वृत्तलेख, निःपक्षपाती पत्रकारिता सिद्धांताच्या विरोधात आहे. मर्यादीत नमून्यांसह असलेल्या प्राथमिक अभ्यासाचे सामान्यीकरण अयोग्य आहे. औषध प्रभावी नाही असा दावा यात कुठेही केलेला नाही. अभ्यासाच्या आधारे स्पष्ट होते की आराम पडण्याची टक्केवारी चांगली आहे.  नमुन्यांची संख्या कमी असल्याने याची खातरजमा केली जाऊ शकत नाही त्यामुळे ते सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय ठरत नाही. मोठ्या प्रमाणावरील नमून्यांच्या व्यापक  अभ्यासात पूरक म्हणून याची परिणामकारकता सिद्ध झाली आहे. पूर्वप्रकाशन अवस्थेतील अभ्यासातच स्पष्ट केले आहे की मोठ्या प्रमाणावरील नमून्यांसह अभ्यास गरजेचा आहे.
तसेच, हिंदी मध्ये वाचा►आयुष-64 को लेकर की जा रही गलत रिपोर्टिंग की आयुष मंत्रालय ने कड़ी निंदा की

डिस्क्लेमर - लेख का उद्देश्य आपतक सिर्फ सूचना पहुँचाना है. किसी भी औषधि,थेरेपी,जड़ी-बूटी या फल का चिकित्सकीय उपयोग कृपया योग्य आयुर्वेद चिकित्सक के दिशा निर्देश में ही करें।