• Home
  • Blogs
  • Marathiआयुष मंत्रालयाने आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी औषधांमध्ये अश्वगंधाच्या पानांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शक सूचना तपासण्यासाठी तज्ञ गटाची स्थापना केली

आयुष मंत्रालयाने आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी औषधांमध्ये अश्वगंधाच्या पानांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शक सूचना तपासण्यासाठी तज्ञ गटाची स्थापना केली

User

By NS Desk | 26-Nov-2021

Ashwagandha leaves in ASU drugs examine in marathi

आयुष मंत्रालयाने यासाठी तज्ञ गटाची स्थापना करून एएसयू (आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी) औषधांमध्ये अश्वगंधा (विथानिया सोम्निफेरल) पानांच्या वापराशी संबंधित प्रकरणाची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयुष मंत्रालयाने यासाठी तज्ञ गटाची स्थापना करून एएसयू (आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी) औषधांमध्ये अश्वगंधा (विथानिया सोम्निफेरल) पानांच्या वापराशी संबंधित प्रकरणाची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी, मंत्रालयाने ASU औषधांमध्ये अश्वगंधाच्या पानांच्या वापराविरोधात मार्गदर्शक तत्वे जारी केली होती.

आयुष मंत्रालयाने अश्वगंधा पानांचा वापर प्रतिबंधित केल्याच्या पार्श्वभूमीवर एएसयू औषध निर्मण उद्योगांच्या भागीदारांकडून निवेदने प्राप्त झाली होती.

तसेच, आयुष मंत्रालयाने हितधारकांना एएसयू उत्पादनांमध्ये अश्वगंधाच्या पानांच्या वापराबाबत समस्यांवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. या चर्चेच्या आधारे, मंत्रालयाने तज्ज्ञ गट स्थापन करून अश्वगंधा (विथानिया सोम्निफेरा) पाने वापरण्यापासून परावृत्त करण्यासाठी औषध उत्पादकांना जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वे पुन्हा तपासून पाहण्याचा निर्णय घेतला आहे.

वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे एएसयू उत्पादनांमध्ये अश्वगंधाची पाने/अश्वगंधाच्या पंचांगाच्या वापराबाबत तज्ञ गट सरकारला योग्य शिफारसी करेल.
पुढे वाचा► आयुष-64 ची मागणी आता सहज पूर्ण होणार; सीसीआरएएस ने 46 कंपन्यांना तंत्रज्ञान हस्तांतरित केले

डिस्क्लेमर - लेख का उद्देश्य आपतक सिर्फ सूचना पहुँचाना है. किसी भी औषधि,थेरेपी,जड़ी-बूटी या फल का चिकित्सकीय उपयोग कृपया योग्य आयुर्वेद चिकित्सक के दिशा निर्देश में ही करें।